Last Updated on 19 Sep 2024 6:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वाटेगाव-सुरुल युनिटचे अवधूत पाटील यांनी दुसरा,तर रितेश पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाने आयोजित राजारामबापू मॅरेथॉन स्पर्धेत साखराळे युनिटच्या अतुल मंडले यांनी पहिला,वाटेगाव-सुरुल युनिटचे अवधूत पाटील यांनी दुसरा,तर रितेश पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे.कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,करमणूक समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,कामगार नेते शंकरराव भोसले,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूं ना बक्षीस वितरण करण्यात आले.
मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते-चौथा क्रमांक- धनाजी पाटील (साखराळे),पाचवा क्रमांक- सुशांत वाळखिंडे (साखराळे),सहावा क्रमांक- विकास पवार (वाटेगाव),सातवा क्रमांक- श्रीकांत सावंत(साखराळे),आठवा क्रमांक- सतिश इरकर (साखराळे),नववा क्रमांक- विकास देसाई (साखराळे),दहावा क्रमांक- प्रथमेश पवार (कारंदवाडी),अकरावा क्रमांक- संग्राम मस्के(साखराळे),बारावा क्रमांक- अंकुश देसाई (वाटेगाव),तेरावा क्रमांक-सागर पाटील (साखराळे),चौदावा क्रमांक-महेश कोकाटे (साखराळे),पंधरावा क्रमांक-अनिल जाधव(साखराळे).
दरम्यान कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या हस्ते पंचायत समितीच्या आवारात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तसेच झेंडा दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. ही मॅरेथॉन इस्लामपूर शहरातील झरी नाका,आझाद चौक,लाल चौक,गांधी चौक, यल्लाम्मा चौक,कचेरी मार्गे कारखान्यावर पोचली. साधारण साडेतीन किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यात आले.
संचालक विठ्ठल पाटील,डॉ.योजना शिंदे- पाटील,अमरसिंह साळुंखे,रमेश हाके, सचिव डी.एम.पाटील,एस.डी.कोरडे,विजय मोरे, सुनिल सावंत,तानाजी खराडे,राजेंद्र चव्हाण, संताजी चव्हाण,संभाजी सावंत,उमेश शेटे, मनोहर सन्मुख,विकास पवार,महेश पाटील, अनिलकुमार पाटील,विश्वनाथ पाटसुते,संजय सत्रे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.











































































