Last Updated on 28 Jul 2024 6:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ‘जय जवान,जय किसान’ चा नारा देत आमदारकीची शपथ घेतली.
विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मागील काही दिवसांपूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या पार पडल्या. यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. विधान परिषदेमध्ये या सर्व आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह सदाभाऊ खोत यांनी शपथ घेतली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उपस्थित होते.

1. पंकजा मुंडे-बीजेपी 2. योगेश टिळेकर-बीजेपी 3. अमित गोरखे-बीजेपी 4. परिणय फुके-बीजेपी 5. सदाभाऊ खोत-बीजेपी 6. भावना गवळी-शिंदे शिवसेना 7. कृपाल तुमाने-शिंदे शिवसेना 8. शिवाजीराव गर्जे-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी 9. राजेश विटेकर-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, 10. प्रज्ञा सातव-कांग्रेस 11. मिलिंद नार्वेकर-उद्धव ठाकरे पार्टी या 11 सदस्यांनी शपथ घेतली.
शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत म्हणाले,’महाराष्ट्रातील जनतेला मी आश्वासित करतो की माझ्या या पदाचा उपयोग हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनता, कष्टकरी वर्ग आणि माझ्या बळीराजाच्या उन्नतीसाठी करेन’











































































