Last Updated on 05 Mar 2024 11:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । सुमारे तासभर डाऊन झाल्यानंतर फेसबुकची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. त्याचवेळी इन्स्टाग्रामची सेवाही सुमारे दीड तास डाऊन राहिल्यानंतर सुरू झाली. परंतु फेसबुकची सेवा सुमारे तासभर प्रभावित राहिल्याने वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आणि लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (X) वर आपापल्या पद्धतीने तक्रारी केल्या.
याआधी, जगभरातील युजर्सनी जुलै 2023 मध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याची तक्रार केली होती. तर ऑक्टोबर 2021 मध्येही फेसबुक आणि इंस्टाग्राम तासन्तास डाउन होते. 2019 मध्येही भारतासह अनेक देशांमध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्यामुळे युजर्सना त्रास झाला होता.









































































