Last Updated on 07 Feb 2024 8:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर क्रीडा व युवक कल्याण आयुक्तपदी राजेश देशमुख वर्णी लागली आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात येत आहेत.राज्य सरकारकडून राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.विभागीय आयुक्त सौरभ राव यांचीही बदली करण्यात आली होती.काही दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.अमितेश कुमार यांनी पुण्यातील सर्व कुख्यात गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलवत ओळख परेड घेतलेली पाहायला मिळाली. अशातच आता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांची बदली झाली आहे.
सुहास दिवसे हे याआधी क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदी कार्यरत होते. डॉ. राजेश देशमुख हे आता सुहास दिवसे यांच्या जागी क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील.











































































