Last Updated on 25 Jan 2024 12:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर येथे भाजपा जिल्हा युवा,महीला,किसान मोर्चा व प्रकोष्ठ,सेलच्या पदाधिकारी निवडी संपन्न
सांगली । भाजपा पक्षात घराणेशाहीला स्थान नाही.इथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते. त्यांच्या कामाला महत्व दिले जाते.जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात भाजपाचे ९०० पदाधिकारी काम करत आहेत.सर्वांनी सरकारच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचवाव्यात,असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा)यांनी केले.
इस्लामपूर येथे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा युवा ,महिला,किसान मोर्चा व प्रकोष्ठ,सेल जिल्हा संयोजक पदाधिकरी निवड बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा व सांगली जिल्हा प्रभारी प्रिया पवार होत्या.यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, महिला युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉ.उषा दशवंत यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी भाजपच्या जिल्हा युवा मोर्चा,किसान मोर्चा,महिला मोर्चा व जिल्हा प्रकोष्ठ,सेलच्या पदाधिकारी निवडी पार पडल्या.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली.
निशिकांत भोसले-पाटील(दादा)पुढे म्हणाले,देशाचा प्रमुख प्रामाणिक असल्याने देश विकासात अग्रेसर आहे. राहुल गांधी जिथे जात आहेत, तेथे काँग्रेस पक्ष संपत चालला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील ८० कोटी लोकांनां मोफत धान्य घरपोच केले जात आहे.देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम आहे.जगाची अर्थव्यवस्था तीन नंबरला आणून ठेवली आहे.५७६ वर्षांपूर्वीचे राम मंदिर बांधणीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे.नूतन पदाधिकाऱ्यांनी लोकांच्या आरोग्य,वीज,शेती प्रश्न सोडविण्याबरोबर केंद्र व राज्य शासनाने लोकहिताच्या आखलेल्या योजना प्रत्येक घटकापर्यत पोहचवुन त्यांना उद्योग व्यवसायातुन अर्थिक सक्षम बनविण्यासाठी योगदान द्यावे.
भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा प्रिया पवार म्हणाल्या,निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपण मोठ्या ताकदीचे पदाधिकारी आहात. नूतन पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे.विकसित भारताचे साक्षीदार होण्यासाठी सहभागी व्हा.युवकांचे मोठे संघटन करा. निशिकांत पाटील यांचे हात मजबूत करा.येणाऱ्या निवडणुकीत इस्लामपूर मतदार संघासह जिल्ह्यात परिवर्तन घडवाचे आहे.
किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड म्हणाले,जिल्ह्यातील दोन लोकसभा व आठ विधानसभा मतदार संघात आपण कमळ फुलवायचे आहे.नूतन पदाधिकाऱ्यांनी मिळालेल्या पदाचा उपयोग समाजसेवेसाठी करावा.भाजप पक्षाकडून तुम्ही केलेल्या कामाचे मूल्यमापन केले जाईल.१० वर्षात एकही भ्रष्टचाराचा आरोप नसणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. शेतकऱ्यांची सुख-दुःखे समजावून घ्या.त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा.
भाजपा जिल्हा महिला मोर्चा च्या अध्यक्षा डॉ. उषा दशवंत म्हणाल्या,२०२४ ची निवडणूक ही निवडणूक नसून ते एक युद्ध असणार आहे.ते युद्ध म्हणजे भ्रष्टाचार विरोधात असणार आहे.१० वर्षांपूर्वी झालेले भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे.पारदर्शकता ही पक्षाचे ब्रीद आहे.महिलांचे सबलीकरण मोठ्या प्रमाणत सुरू आहे.महिलांना केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती साधली आहे.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील म्हणाले,नूतन पदाधिकाऱ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे.पक्षाचे काम समाजातील तळागाळापर्यंत पोहचवा.
यावेळी भाजपचे वाळवा तालुकाध्यक्ष निवास पाटील,भाजपा जिल्हा चिटणीस धैर्यशील मोरे,भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षा आशाताई पवार,चिटणीस जयश्री रणदिवे,जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील,वाळवा तालुका महिला मोर्चा च्या अध्यक्षा सुरेखा जगताप, दिग्विजय नलवडे, वाळवा तालुका भाजपा ओबीसी चे अध्यक्ष मधुकर हुबाले, लक्ष्मण कदम,नरसिंहपुरच्या सरपंच शोभा जगताप,वंदना थोरात आदी अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.भाजपाचे सरचिटणीस संदीप सावंत यांनी सूत्रसंचालन केले.जिल्हा सरचिटणीस संदीपराज पवार यांनी आभार मानले.









































































