Last Updated on 02 Jun 2023 4:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
येथे पाहा निकाल…
link वर क्लिक करा
👇👇👇👇
विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार
राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के, कोकण विभागाचा निकाल हा 98.11 टक्के
अधोरेखित ऑनलाईन डेस्क । राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. गेल्यावर्षी हा निकाल 96.94 टक्के इतका होता. त्या तुलनेत यंदाच्या निकालात 3.11 टक्के घसरण झाली आहे.तसेच सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे.तर नागपूरचा सर्वात कमी लागला आहे. कोकणचा निकाल हा 98.11 टक्के लागला आहे.
महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा दहावीचा निकाल तीन टक्क्यांनी घसरला आहे.मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णाचे प्रमाण3.82 टक्क्यांनी जास्त आहे.गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती.
कोकण विभाग अव्वल तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल
दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर त्याखालोखाल कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, लातूर, नाशिक आणि नागपूर विभागाने कामगिरी केली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात कोकण विभागाचा निकाल 98.11 सर्वाधिक टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 92.05 टक्के जाहीर झाला आहे.
विभागवार निकाल
कोकण : 98.11 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
पुणे : 95.64 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
नागपूर : 92.05 टक्के
निकालाची वैशिष्ट्ये
❂ राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के
❂ पुनरपरिक्षार्थींचे उत्तीर्णतेचे प्रणाम 60.90 टक्के
❂ खाजगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 74.25
❂ दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 92.49 टक्के
❂ राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 98.11टक्के
❂ एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्क्यांपेक्षा जास्त.
❂ मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 3.82 टक्क्यांनी जास्त.
❂ राज्यातील 5,26210 विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत, 3,34,015 द्वितीय श्रेणीत तर 85218 उत्तीर्ण.
❂ 14 जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेत उपलब्ध होतील
❂ यावर्षी दहावीचा निकाल 93.83 , मागीलवर्षी तो 96.94 टक्के होता. याचा अर्थ मागील वर्षीपेक्षा 3.11 टक्क्यांनी निकाल घटला.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या
दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 41 हजार 666 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 29 हजार 096 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 93.83 अशी आहे, तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 60.90 अशी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण उल्लेखनीय
नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 8,397 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,312 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले. त्यातील 7,688 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 92.49 अशी उल्लेखनीय आहे.
मुलींची आघाडी
सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.87 इतकी असून मुलांची टक्केवारी 92.05 इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.82 टक्क्यांनी जास्त आहे.
दहावीच्या एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर 23 हजार 013 शाळांपैकी 6,844 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी 4 लाख 89 हजार 455 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, तर 5 लाख 26 हजार 210 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 98.11 टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92.05 टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात 95.64, औरंगाबाद विभागात 93.23, मुंबई विभागात 93.66, कोल्हापूर विभागात 96.73, अमरावती विभागात 93.22, नाशिक विभागात 92.22 आणि लातूर विभागात 92.67 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.
कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या
येथे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून विद्यार्थी महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा निकाल 2023 पाहू शकतात…
🌑 दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
🌑 दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
🌑 तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा. (आईचे नाव)
🌑 दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
🌑 निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होतील
विद्यार्थी पुढील वैकल्पिक वेबसाइटवरून त्यांचा MH SSC निकाल 2023 तपासू आणि डाउनलोड करू शकतील.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनासाठी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन कर्ज…
निकाल लागल्यानंतर गुणपडताळणीसाठी 3 जून ते 12 जून हा कालावधी देण्यात आला आहे.त्याचबरोबर छायाप्रतीसाठी 3 जून ते 22 जून या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरावे लागणार आहे.उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनासाठीदेखील मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन कर्ज करायचा आहे.पण त्याआधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसात पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करावयाचा आहे.पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट मध्ये होणार आहे.पुनर्परिक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ७ जून पासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.
![]()












































































