Last Updated on 01 Jun 2023 5:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
तुमच्या ओळखीतल्या किमान पाच एक जणांचा तरी वाढदिवस नक्कीच असेल.फेसबुकवरही १ जूनला वाढदिवस असलेली अनेक मंडळी तुम्हाला दिसतील. काय योगायोग बघा ना आपल्या ओळखीतल्या अनेकांचे वाढदिवस एकाच वेळी असण्याचा दिवस म्हणजे 1 जून.
तर यामागचं कारण फार काही मोठं नाही. पूर्वी जन्म-मृत्यूची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपलं मुलं कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आलंय हे अनेक आई वडिलांच्या लक्षातही नसायचं.तेव्हा आतासारखी रुग्णालयातही बाळंतपण व्हायची नाहीत त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्नच यायचा नाही. पुढे ही मुलं जेव्हा मोठी झाली, शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा अशा मुलांना १ जून ही जन्मतारीख देण्यात आली.
माजी मंत्री,रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या भाषणातील गावरान शैली नेहमी चर्चेत असते.त्यांचे असेच एक भाषण आज प्रचंड व्हायरल होत आहे.निमित्त आहे….1 जूनचा वाढदिवस!
सदाभाऊ हे बोलताना आपल्याकडची रांगडी भाषा वापरतात.त्यात कुठेही बडेजावपणा नाही.म्हणून ते समोरच्याला आपलेसे वाटतात.समोरच्याचा मनाचा ठाव घेणं ज्याला जमलं त्यानं राजकारणात अर्धे मैदान काबीज केलं असं म्हणता येईल.सदाभाऊ हे त्यातील एक आहेत असं म्हणता येईल.
1 जूनला वाढदिवस असणाऱ्यांच्या बद्दलचे सदाभाऊ खोत यांच्या खास गावरान शैलीतील भाषण सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
![]()
प्रचंड व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा
![]()









































































