Last Updated on 31 Mar 2023 11:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सीजीटीएमएसईने 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वार्षिक हमी शुल्क वार्षिक 2% या सर्वोच्च दरावरून 0.37% पर्यंत कमी करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली
हमीसाठी कमाल मर्यादा 2 कोटी रुपयांवरून वाढवून 5 कोटी रुपये करण्यात आली
नवी दिल्ली । केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये,केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी येत्या 1 एप्रिलपासून पत हमी योजनेची पुनर्रचना करण्याची घोषणा केली,ज्यामध्ये 2 लाख कोटी रुपये अतिरिक्त तारण – मुक्त हमी कर्ज देता यावे यासाठी निधीमध्ये 9,000 कोटी रुपयांची भर घालण्यात येणार आहे तसेच कर्ज संबंधी खर्चात सुमारे 1 टक्क्यांनी कपात होईल.
या अनुषंगाने , पुढील महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत :
- क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्रायझेस (सीजीटीएमएसई) च्या एकूण निधीमध्ये 30.03.2023 रोजी 8,000 कोटी रुपयांची भर घालण्यात आली.
- सीजीटीएमएसईने 1 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी वार्षिक हमी शुल्क वार्षिक 2% च्या सर्वोच्च पातळीवरून 0.37% पर्यंत कमी करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगांचा कर्जासाठी होणारा एकूण खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
- हमीची कमाल मर्यादा 2 कोटी रुपयांवरून वाढवून 5 कोटी रुपये करण्यात आली आहे.
- 10 लाख रुपयांपर्यंतच्या थकित कर्जाच्या हमीसंदर्भात दाव्यांचा निपटारा करण्यासाठी आता यापुढे कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याची आवश्यकता नाही.
- सीजीटीएमएसईने आर्थिक वर्ष 2022 – 23 दरम्यान 1 लाख कोटी रुपये मूल्याची हमी मंजूर करण्याचा मैलाचा टप्पा गाठून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.












































































