Last Updated on 19 Sep 2022 10:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्धा येथे आयोजित राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचा आढावा आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवाग्राम, वर्धा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.त्याच दिवशी ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येईल.
आपल्या प्रत्येकामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीनेच राज्यातील जनतेने यापुढे एकमेंकाशी संवाद साधताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी केले. या अभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असून या सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रपुरुषांचे स्मरण करण्यात येणार आहे. आलेआहे. या कार्यक्रमास उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सेवाग्राम येथे आयोजित कार्यक्रमाच्या सादरीकरणाबाबतची बैठक सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आ. पंकज भोयर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, पुरातत्त्व संचालक डॉ. तेजस गर्गे आदी उपस्थित होते. 2 ऑक्टोबर रोजी होणार्या सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रपुरुषांचे स्मरण करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महात्मा गांधी जयंतीला वर्धा सेवाग्राम येथून राज्य सरकारच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जनतेने यापुढे एकमेंकाशी संवाद साधताना हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांनी केले.











































































