Last Updated on 14 Oct 2022 4:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दिल्ली | हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. येत्या 12 नोव्हेंबरला (शनिवारी) हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतदान होणार आहे.तर 8 डिसेंबर रोजी (गुरुवारी) मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून दिल्लीत निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये 55 लाख 07 हजार 261 मतदार आहेत. यामध्ये 27 लाख 80 हजार पुरुष मतदार आहेत. तर 27 हजार 27 महिला मतदार आहेत. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे एक लाख 22 हजार मतदार आहेत. त्याशिवाय दिव्यांग मतदारांची संख्या 56 हजार इतकी आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या एक लाख 86 हजार इतकी आहे.
आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचर प्रदेशात 68 विधानसभा मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यासाठी 25 ऑक्टोबर 2022 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटा दिवस असेल. 27 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर 29 ऑक्टोबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांची घोषणा, पाहा तारखा
एकाच टप्प्यात मतदान होणार
अर्ज भरण्याची सुरुवात- 17 ऑक्टोबर 2022
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 25 ऑक्टोबर 2022
अर्जाची छानणी- 27 ऑक्टोबर 2022
अर्ज माघारी घेण्याची मुदत- 29 ऑक्टोबर 2022
मतदान- 12 नोव्हेंबर 2022
मतमोजणी/निकाल- 8 डिसेंबर 2022









































































