Last Updated on 23 May 2023 3:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पोटासाठी नाचतो मी पर्वा कुणाची : लक्षवेधी लखन धोंडिबा नाईक
पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्यावरू हाकेच्या अंतरावर श्रीवर्धन फॅमिली रेस्टॉरंट च्या बाहेर एक लक्षवेधी व्यक्तिमत्व दिसेल.टोपी गॉगल छानशा ड्रेस कोड पायात बूट रंगाने सावळा ऑल टाईम फ्रेश कलाकार….
हॉटेलच्या ग्राहकांना बोलण्यासाठी काही ठिकाणी अशी लोक असतात पण लखन चा नादच खुळा…लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ब्रेक डान्स,स्लो मोशन…मिथुन चक्रवर्ती गोविंदा ते आत्ताचे सुपरस्टार आणि त्यांची गाणी मानत आठवत सुरू असते कलाकारी,रील्स स्टार हे अजरामर कलाकृती गाणी,डान्स,विनोद आपल्या स्टाईलने अवघ्या तीस सेकंदात इतक्या उंचीवर नेऊन ठेवतात की अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटते.यामुळे लोकांना विरूगळ्याचे खूप मोठे साधन मिळाले आहे.
पण देवाचं देणं पदरात पडलय सुखाचं लेणं उदरात दडलेल्या लखन धोंडिबा नाईक या कर्नाटकातून आलेल्या सध्या आर्जूनवाडी,गडहिंग्लज तालुक्यातील या कलाकाराला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नाचावे लागते,आनंदाने डोलावं लागतंय…..

एका महिन्यापुर्वी त्यांच्या आईचे दुःखदायक निधन झाले,दुःख पाटीवर टाकून बाप,दोन मुले पत्नी यांच्या साठी स्वतःला नाचावे लागत आहे.प्रारब्धाच्या तालावर…पण परिस्थितीवर मात करण्यात लखन तरबेज आहे ते पूर्ण जोशात म्हणतात माय नेम ईज लखन…पोटासाठी नाचतो मी पर्वा कुणाची ?
हायवेवरून जातांना गाडीचा वेग मंदावला जातो तो या कलाकाराच्या कलाकारीने लोक आनंदित होतात…लखन च्या स्टाईलने मनाच्या धुंदीत,लहरीत कोणताच आवाज नसताना मनाच्या संगीतावर स्वार होवून आपले काम प्रामाणिकपणे करतोय हा डान्सर ! उन्हात घामात,हिवाळ्यात गारव्यात तर भर पावसात हायवेला सुरू आहे लक्षवेधी डान्स…कधीही जाता येता हॉटेल श्रीवर्धन ला थांबलात छान नाष्टा केलात,जेवलात तर लखनला मायेची शाबासकी आणि टीप द्यायला विसरू नका !![]()
✍️सचिन कांबळे, झेले













































































