Last Updated on 07 Jun 2023 5:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | केंद्र सरकारच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-24 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता दि.20 जून 2023 पर्यत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन वस्त्रोद्योग आयुक्त एम.जे. प्रदिप चंदन यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता 13 जागा, आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता 1 जागा आणि वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडून दि. 20 जून २2023 पर्यंत विहीत नमून्यात प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी इच्छुक उमेदवारांनी दि. 20 जून 2023 पर्यंत संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग आयुक्त प्रदीप चंदन यांनी दिली आहे.









































































