Last Updated on 13 Jan 2024 2:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कासेगाव (ता वाळवा) येथे जेष्ठ नेते, वाळवा पंचायत समितीचे माजी सभापती स्व.जनार्दनकाका पाटील यांच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकेनेते राजारामबापू पाटील यांच्या ‘पदयात्री’स्मारकामध्ये रविवार दि.१४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी स्व.काकांच्या प्रतिमेस अभिवादन व भोजन कार्यक्रम होणार आहे.वृक्षारोपण,वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना भोजन व कीर्तन आदी उपक्रमांचे आयोजन केलेले आहे.कासेगाव व परिसर,तसेच तालुका व जिल्ह्या तील मान्यवर-ग्रामस्थ अभिवादन करण्यास येणार आहेत.
सुप्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन केलेले आहे.शंभूराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आझाद विद्यालय येथे रात्री ८ वाजता हे कीर्तन होणार आहे.या कीर्तनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
स्व.जनार्दनकाका पाटील यांनी कासेगाव तसेच परिसरातील गावांशी अगदी जिव्हाळ्याचे नाते होते.त्यांनी पं.स.सभापती,राजारामबापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य,गावचे सरपंच या पदांच्या माध्यमातून गांव आणि तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान केलेले आहे.सरळ मनाचा,कणखर नेता अशी त्यांची ओळख होती.ते स्व.बापूंचे पुतणे,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांचे चुलत भाऊ,तर माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील यांचे वडील होत.












































































