Last Updated on 10 Nov 2024 8:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे केले आवाहन
सांगली । आपला खरा शत्रू जातीयवादी भाजपा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील,स्व.एन.डी. पाटील यांनी आयुष्यभर जातीयवादी विचारांच्या विरोधात लढा दिला. आता कोणी तरी येईल,जुन्या घटना-प्रसंग उकरून काढेल, मात्र त्यांना थारा देवू नका. पुन्हा कणखर, स्वाभिमानी आणि पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहा आपल्या ढवळी गावातून आ.जयंत पाटील यांना कोणत्या ही परिस्थितीमध्ये मोठे मताधिक्य मिळायला हवे,अशी भावना खा.शरदचंद्र पवार यांच्या भगिनी आणि माजी सहकार मंत्री,थोर विचारवंत प्रा.एन.डी.पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील (माई) यांनी ढवळी (ता.वाळवा) येथील प्रचार सभेत बोलताना केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रीमती सरोज पाटील म्हणाल्या, स्व.एन. डी.पाटील व आ.जयंतराव पाटील यांचे वैचारिक मतभेद असू शकतात. त्याचा कोणी बाऊ करण्याची गरज नाही. भाजपाची पिलावळ जाणीवपूर्वक आपल्या राज्याला बदनाम आणि दुर्बल करण्याचा डाव खेळत. त्यांच्या कोणत्याही आमिषाला,अपप्रचाराला बळी पडू नका.
आ.पाटील म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील,क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, स्व.एन.डी.पाटील यांनी आयुष्य भर पुरोगामी विचार जोपासला आहे. आम्ही हाच विचारांचा वारसा घेऊन राज्यात राजकारण करीत आहोत. आपण आम्हास ताकद द्या.
महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव म्हणाल्या,आमच्या भगिनी लाडक्या बहिणी च्या पंधराशे रुपयाला फसणार नाहीत.तिची सुरक्षितता,रोजगार आणि शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी आपण काय केले?
युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव म्हणाले, सातत्याने पक्ष व विचार बदलणारा उमेदवार जनतेशी प्रामाणिक कसा रहाणार? आमच्या युवकांची सरकारने घोर निराशा केली आहे.
जेष्ठ नेते ॲड. एन.आर.पाटील, स्व.एन.डी.पाटील यांचे चिरंजीव प्रशांत पाटील,स्नुषा संगीता पाटील,नेर्लेचे सरपंच संजय पाटील, बँकेचे संचालक सुरेश पाटील, कारखान्याचे माजी संचालक लालासो पाटील, सरपंच सुजित पाटील, उपसरपंच आनंदराव पाटील, शंकरराव पाटील यांच्यासह गावातील कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.












































































