Last Updated on 29 Oct 2023 9:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । एका बाजूला ऊसाला प्रतिटन 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी माजी खा. राजू शेट्टी यांची पदयात्रा सुरु असताना दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारांनी कारखाने सुरु केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची हवा सोडली.
हा प्रकार नरसिंहपूर- कृष्णा कारखाना रस्त्यावर कृष्णा कॅनॉल जवळ आज शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.संबंधित ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर कृष्णा कारखान्याकडे निघाला होता.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा ऊस वाहतूक टॅक्टर थांबवून चाकातील हवा सोडण्यात आली.
हेही वाचा – राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेचा सांगली जिल्ह्यात प्रवेश
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यात आली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आडवुन धरली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव,राजाभाऊ पाटील,बाबुराव शिंदे,प्रकाश देसाई,जालिंदर पाटील,अमर पाटील,प्रदीप पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते.(‘अधोरेखित’चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी भागवत जाधव म्हणाले,ऊसाला दुसरा हप्ता ४०० रुपये प्रतिटन मिळावा,यासाठी खा राजु शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातुन 522 किलोमीटर अंतरावर यात्रा सुरू केली.साखर कारखान्याची आडमुठ्या भूमिका बंद करून 400 रूपये प्रतिटन दुसरा हप्ता जमा करावा.












































































