Last Updated on 22 Sep 2024 7:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वाळवा तालुका ओबीसी काँग्रेसची बैठक : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ताकद देणार
सांगली । इस्लामपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मागासवर्गीय, ओबीसी व अल्पसंख्यांक यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अल्पसंख्याक लोकांना जास्तीत जास्त संधी देण्याचे काँग्रेस पक्षाकडून केले जाणार आहे. तसेच पंचायत समिती गटनिहाय ओबीसींच्या बैठकी घेऊन पक्षास बळकटी आणण्याचे काम चालू आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ताकद देणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस ओबीसी विभागचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले.
वाळवा तालुका ओबीसी काँग्रेस आयोजित पदाधिकारी बैठकीत बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस नंदकुमार कुंभार, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब खोत, विभागीय ओबीसी अध्यक्ष विवेक गुरव, विभागीय उपाध्यक्ष सलमाल आवटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भानुदास माळी म्हणाले, आगामी विधानसभा , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्यांक, ओबीसी, मागासवर्गीयांचा मेळावा घेणार आहे. यामध्ये नूतन खासदार विशाल पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, चंद्रकांत हंडोरे उपस्थित राहणार आहेत.
नंदकुमार कुंभार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय काँग्रेसला ताकद देईल. स्थानिक स्वराज्य निवडणुका काँग्रेस सहबळावर लढवणार असल्याने ओबीसी समाजाला निवडणुकीत संधी मिळणार आहे.
या बैठकीचे सूत्रसंचालन काँग्रेस ओबीसी विभाग वाळवा तालुका अध्यक्ष संदीप परीट यांनी केलें.यावेळी संदीप मोहिते, सेवादल अध्यक्ष अजम मिस्त्री, बोरगाव सुहास पाटील, तालुकाध्यक्ष सांस्कृतिक विभाग बाळासो कांबळे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक परीट,अशोक पवार,सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजी जावळे, विनय कांबळे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टी जगदीश माळी, प्रसाद यादव – बहेकर, हिम्मत कांबळे, सचिन पाटील, भाऊ पाटील, तानाजी कुंभार, विद्या मोरे, संजय तडाके, सातारा जिल्हा मागासवर्गीय अध्यक्ष रेखा माळी, तालुका सरचिटणीस व विभाग मंगेश वाटेगावकर, देशभूषण पाटील, चेतन पाटील, पर्यावरण अध्यक्ष सुरेश कांबळे उपस्थित होते.










































































