Last Updated on 01 Sep 2023 9:11 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सर्वोच्च न्यायालयात आता 22 सप्टेंबरला होणार सुनावणी
नवी दिल्ली | राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबत दाखल केलेल्या याचिकांवर 1 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.परंतु, ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत.
विशेष म्हणजे या प्रकरणातील याचिकेवर मागील सुनावणी तब्बल एक वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये झाली होती. त्यानंतर सातत्याने या सुनावणीला पुढची तारीख मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि ओबीसी आरक्षण ही दोन्ही प्रकरणे उच्च न्यायालयात आहे. आज 1 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता होती.मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळापत्रकात या याचिकेचा समावेश नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.त्यामुळे ओबीसी आरक्षणासह राज्यातील 15 महानगरपालिका,92 नगरपालिकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.आता या दोन्ही याचिकांवर 22 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.









































































