Last Updated on 12 May 2023 4:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी बी एस ई चा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.
या परीक्षेत जवळपास ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.या परीक्षेत एकूण ९०.६८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलींनी मुलांपेक्षा सहा टक्क्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
त्रिवेंद्रम विभागात सर्वाधिक ९९.९१ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थी त्यांचे निकाल cbse.gov.in आणि results.nic.in या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर देखील पाहू शकतात.
घरसबसल्या किंवा आहात त्या ठिकाणाहून कसा पाहाल निकाल?
– निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
– तिथं होमपेजवर CBSE Board Class 12th Result 2023 या लिंकवर क्लिक करावं.
– आता विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक तिथे टाकावा.
– क्रमांक देताच पुढच्या क्षणाला तुमच्यासमोर निकाल दिसेल.
– आता हा निकाल पाहून तुम्ही तो डाऊनलोड करा.











































































