Last Updated on 13 Aug 2022 8:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 30 हजार 100 क्युसेक्स विसर्ग वाढवणार
कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा । राज्याच्या वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे.हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पुढील तीन दिवसामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 30 हजार 100 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने सर्वच धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.आज दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता धरणाची पाणी पातळी 2 हजार 153 फूट 8 इंच झाली असून धरणामध्ये 92.59 TMC (87.97 टक्के) पाणीसाठा झाला आहे.
मागील 24 तासात धरणातील पाणीसाठ्यामध्ये 3.62 TMC इतकी वाढ झाली आहे.सद्यस्थितीत धरणाच्या वक्र दरवाजामधून 9 हजार 596 क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू असून धरण पायथा विद्युत गृहामधून 2 हजार 100 क्युसेक्स असा एकूण 11 हजार 696 विसर्ग चालू आहे.
हवामाना विभागाने सातारा जिल्ह्यात तीन दिवसामध्ये अति पर्जन्यमान होणेची पूर्व सुचना दिली आहे. त्यामुळे उद्या दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे 4 फुट 6 इंच उघडून 28000 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 30 हजार 100 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे.त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
पूर नियंत्रण कक्ष
सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक – 13/08/2022 08:00 PM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/ 17’1″
2)भिलवडी पूल – (53)/29’10”
3)आयर्विन- (45)/29’3″
4)राजापूर बंधारा -(58)/45’5″
5) राजाराम बंधारा-(43)/41’7″
पाणीसाठा (TMC)/ विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 31239
2) आयर्विन पूल – 55550
3) राजापूर बंधारा- 153542
4) राजाराम बंधारा – 61294
5) कोयना धरण – 92.81 TMC / 11696
6) वारणा धरण- 31.2 TMC / 9365
7)अलमट्टी धरण- 103.465 TMC
आवक – 195750
जावक-2,25,000










































































