Last Updated on 16 Sep 2023 12:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण देशभर रविवार दि. १७ सप्टेंबर ते सोमवार दि.२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानामध्ये लोकहिताचे सामाजिक उपक्रम राबवुन राष्ट्र प्रथम हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्हा सर्वांचा असुन हे अभियान सांगली जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था व त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते विशेष प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले -पाटील यांनी दिली.
भाजपाच्या वतीने प्रत्येक वर्षी दि.१७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये संपुर्ण देशभर सेवा पंधरवडा अभियान राबविले जाते. यामध्ये सोमवार दि. १८ सप्टेंबर रोजी मौजे डिग्रज, गुरूवार दि. २१ सप्टेंबर रोजी दुधगाव, शुक्रवार दि. २९सप्टेंबर रोजी बागणी, शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी नरसिंहपुर, सोमवार दि. २ ऑक्टोबर रोजी मसुचीवाडी, गुरूवार दि. ४ ऑक्टोबर रोजी रेठरेहरणाक्ष या गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या विशेष सहकार्यातुन राबविण्यात येणार आहे. तर प्रकाश ब्लड बॅंकेच्या वतीने मंगळवार दि. २६ सप्टेंबर रोजी इस्लामपुर शहरामध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आष्टा शहरामध्ये बुधवार, दि.२७ सप्टेंबर रोजी ६०० हुन अधिक नागरिकांची आयुष्यमान कार्ड नोंदणी करून त्याचे वाटप करण्यात येणार आहे. गुरूवार दि. २८ सप्टेंबर रोजी आष्टा शहरातील विविध समाजातील नागरिकांशी संपर्क साधुन त्यांचे प्रश्न जाणुन घेवुन ते सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. दि. २९ व ३० सप्टेंबर रोजी इस्लामपुर शहरातील विविध समाजातील नागरिकांशी संपर्क साधुन त्यांचे प्रश्न जाणुन घेवुन ते सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. मंगळवार दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त वाळवा तालुक्यातील हाजारो भाविकांचे श्रध्दा स्थान असणार्या श्री मच्छिंद्रनाथ गडाची स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.
सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांचे कार्य व सेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचावी म्हणुन इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातुन संपुर्ण जगाचे लक्ष वेधुन घेतले आहे. भारत देश इतर देशाच्या विकासाच्या तुलनेत पुढे आणला गेला आहे. याचे कौतुक भारत देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. त्यांच्या चांगल्या कामगिरीचे छायाचित्रणाचे प्रदर्शन इस्लामपुर विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती शेवटी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील(दादा) यांनी दिली.
यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धेर्यशील मोरे, उपाध्यक्ष निवास पाटील, वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, इस्लामपुर शहर भाजपाचे अध्यक्ष अशोक खोत, वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, सरचिटणीस दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, भाजपा इस्लामपुर शहर संघटन सरचिटणीस प्रविण परीट, बावची ग्रामपंचायत सदस्य रणजीत माने, विश्वजीत पाटील आदीसह अन्य मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










































































