Last Updated on 12 Aug 2022 7:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन – कार्यकारी अभियंता ज्योती देवकर
धरणांतील विसर्ग व मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ
एन.डी.आर.एफ. ची दोन पथके दक्षतेच्या अनुषंगाने जिल्ह्यात दाखल
सांगली । कोयना – वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिपर्जन्यवृष्टी होत असल्याने दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कोयना धरणाचे वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 8 हजार क्युसेक्स विसर्ग व धरण पायथा विद्युत गृहामधून 2 हजार 100 क्युसेक्स विसर्ग असा एकूण 10 हजार 100 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
धरणांमधील विसर्गामुळे व मुक्त पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे कृष्णा नदीची आर्यविन पूल येथील पाणी पातळी अंदाजे 35 फूटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.
आज सकाळी 11 वाजता कृष्णा नदीची आर्यविन पूल येथे पाणी पातळी 29 फूट 3 इंच इतकी आहे. विविध धरणांमधील पाणीसाठा टी.एम.सी. मध्ये व कंसात पाणीसाठ्याची टक्केवारी तसेच विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 88.11 (83), विसर्ग 10 हजार 100, धोम 11.74 (87), कन्हेर 8.85 (88), विसर्ग 8 हजार 642, उरमोडी 8.95 (90),विसर्ग 5 हजार 54, तारळी 5.29 (90), विसर्ग 1 हजार 212, वारणा 31.54 (92), विसर्ग 9 हजार 371.
अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.
एन.डी.आर.एफ. ची दोन पथके दक्षतेच्या अनुषंगाने जिल्ह्यात दाखल

कोयना व वारणा धरणातून होणाऱ्या पाण्याचा विसर्गामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. या अनुषंगाने दक्षता घेण्याच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यात दोन एन.डी.आर.एफ पथके दाखल झालेली आहेत. अद्याप जिल्ह्यामध्ये कोणतीही पूर परिस्थिती नाही. तथापी दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सदरची पथके उपलब्ध ठेवण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.एन.डी.आर.एफ पुणे चे सहायक कमांडट सारंग कुर्वे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक आष्टा (मनोजकुमार शर्मा पथक प्रमुख) व एक पथक सांगली मध्ये (श्री. रघुवंश, पथक प्रमुख ) ठेवण्यात येणार आहे. या पथकामध्ये प्रत्येकी २२ जवान व प्रत्येकी चार बोटी उपलब्ध आहेत. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा करून सद्यस्थिती जाणून घेतली.
पूर नियंत्रण कक्ष
सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक – 12/08/2022 @ 5:00 PM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/18’10”
2)भिलवडी पूल – (53)/31’05”
3)आयर्विन- (45)/29’10”
4)राजापूर बंधारा -(58)/44’02”
5) राजाराम बंधारा-(43)/41’07”
पाणीसाठा (TMC)/ विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 36908
2) आयर्विन पूल – 57220
3) राजापूर बंधारा- 142917
4) राजाराम बंधारा – 61294
5) कोयना धरण – 88.97 TMC / 10100
6) वारणा धरण- 31.54 TMC / 9371
7)अलमट्टी धरण- 107.721 TMC
आवक – 155047
जावक-2,25,000












































































