Last Updated on 13 Jul 2023 8:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 12 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मान्यता देवून,त्यानुसार तालुकानिहाय एकूण 86 गावांचे अंतिम आरक्षण परिशिष्ट 16 “नमूना अ” दिनांक 14 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील 86 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप,“नमूना ब” दिनांक 26 जून 2023 रोजी सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, गट विकास अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय स्तरावर तसेच NIC Website वर तसेच स्थानिक दैनिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिनांक 27 जून 2023 ते दि. 3 जुलै 2023 या कालावधीमध्ये प्राप्त होणाऱ्या हरकती उपविभागीय स्तरावर अभिप्राय घेवून दिनांक 12 जुलै 2023 रोजी अंतिम करून परिशिष्ट 16 मधील अधिसूचना “नमुना-अ” दिनांक 14 जुलै 2023 रोजी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी दिली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे घोरपडी व खानापूर तालुक्यातील मौजे भेंडवडे येथील प्रत्येकी एक हरकत प्राप्त झाली होती. त्यापैकी मौजे घोरपडी येथील हरकत मान्य करण्यात आली असून, मौजे भेंडवडे येथील हरकत अमान्य करण्यात आली आहे.उर्वरित 84 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण संदर्भात कोणत्याही हरकती हरकत कालावधीमध्ये प्राप्त झाल्या नाहीत.त्यामुळे आयोगाने निश्चित करून दिलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 12 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मान्यता देवून,त्यानुसार तालुकानिहाय एकूण 86 गावांचे अंतिम आरक्षण परिशिष्ट 16 “नमूना अ” दिनांक 14 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
अंतिम आरक्षण परिशिष्ट 16 “नमूना अ” प्रसिद्ध करण्यात येणारी तालुकानिहाय गावे पुढीलप्रमाणे
मिरज तालुका – का.खोतवाडी, निलजी बामणी, वाजेगाव. तासगाव तालुका – चिखलगोठण, बिरणवाडी. जत तालुका – गुलगुंजनाळ, को. बोबलाद, कोणबर्गी, बिळूर, खिलारवाडी. कवठेमहांकाळ तालुका – बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, धुळगाव, घोरपडी, करोली टी, कोकळे, शिंदेवाडी (जी), ढोलेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. खानापूर विटा तालुका – देवनगर, भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी तालुका – नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बनपुरी, करगणी, मुढेवाडी, निंबवडे, पूजारवाडी आ, विभूतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी. पलूस तालुका – राडेवाडी, आमणापूर, विठ्ठलवाडी. वाळवा तालुका – तांबवे, शिरटे, साटपेवाडी, कारंदवाडी. कडेगाव तालुका – वाजेगाव, चिंचणी वांगी. शिराळा तालुका – बांबवडे, वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, करुगली, खुजगांव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरशी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पं.त. वारूण, पाचगणी, मानेवाडी, कदमवाडी.









































































