Last Updated on 05 Oct 2022 3:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशासाठी कलंक आहेत,अशा शब्दात संभाजी भिडे यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांवर जहरी टीका केली.बुधवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौड समारोप प्रसंगी ते बोलत होते.’सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे,हा सत्य विचार नसून असत्य विचार आहे. हा इतिहासाला धरून विचार नाही,असे मतही त्यांनी व्यक्त केले.
साधी गोष्ट घ्या.. लोक निवडून देतात, ते आमचे खासदार काय? आमदार काय, लोकप्रतिनिधी काय? शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात, भाडोत्री हे बेकार असून आपल्या लोकशाहीला आणि परंपरेला कलंक आहेत,अशा शब्दांत भिडे गुरुजींनी लोकप्रतिनिधींचा समाचार घेतला.सांगलीत नवरात्रीच्या काळात संभाजी भिडेंच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 35 वर्षांपासून दुर्गामाता दौडीचं आयोजन केले जात आहे.
सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे,हा सत्य विचार नसून असत्य विचार आहे,हा इतिहासाला धरून विचार नाही,असे मत व्यक्त करत आपल्या मातृभूमीसाठी जगणारी माणसं पाहीजे आहेत,पण इथेचं बोंब आहे.साधी गोष्ट घ्या,लोक निवडून देतात,ते आमचे खासदार काय ?आमदार काय,लोकप्रतिनिधी काय ? शरम वाटत नाही.सगळेजण पगार घेतात,भाडोत्री.हे बेकार असून आपल्या लोकशाहीला आणि परंपरेला कलंक आहेत,अशा शब्दांत भिडे गुरुजी यांनी टीका केली.
कोरोनामुळे दोन वर्षे ही दौड होऊ शकली नव्हती.त्यामुळे यंदा शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.









































































