Last Updated on 05 Mar 2024 8:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सांगली जिल्हा प्रशासन यांच्यावतीने कल्पद्रुम मैदान नेमिनाथनगर सांगली येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या आज तिसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या शाहिरांनी सादर केलेल्या पोवाड्यांना व आपली संस्कृती अंतर्गत सादर केलेल्या विविध कार्यक्रमास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी शाहीर बजरंग आंबी, शाहीर शुभम विभूते, शाहीर रामचंद्र नायकू जाधव, शाहीर अवधूत पवार, शाहीर अनंतकुमार साळुंखे यांनी पोवाडे, गोंधळ भवानीचा, भेदिक शाहीरी कलगीतुरा, गवळण आदिचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी दिनांक 5 मार्च रोजी सादर होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे – पहिल्या सत्रात सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत नृत्य संध्या (भरतनाट्यम, कथ्थक, मंगळागौर खेळ सादरीकरण). दुसऱ्या सत्रात सायंकाळी 7 ते 9.30 या वेळेत गुढी महाराष्ट्राची अंतर्गत महाराष्ट्रातील सण परंपरेची गौरवशाली संस्कृती दाखवणारा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.










































































