Last Updated on 16 Oct 2025 8:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । दिपावली सणाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलासिमा हद्दीत दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर दि. 17 ऑक्टोबर 2025 ते 23 ऑक्टोबर 2025 अखेर पर्यंत पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शांतता, सुव्यवस्था राखण्याकरीता (१) पेट्रोल/डीझेल पंप/ डेपो (ii) गॅस सिलेंडर गोडाऊन (iii) केरोसीन तेलाचे डेपो (iv) फटाक्यांची दुकाने (v) ज्वालाग्रही पदार्थांचे डेपो, (vi) रासायनिक पदार्थांचे डेपो या नमूद ठिकाणापासून 100 मीटर आत फटाके उडविण्यास मनाई केली आहे. शाळा, कॉलेज, रूग्णालये, न्यायालये इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जे शांतता झोन मध्ये येतात, त्या भागात १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. फटाक्याच्या लडी व असे फटाके जे मोठे प्रमाणात प्रदुषीत हवा, आवाज, घनकचरा तयार करतात अशा प्रकारच्याा तत्सम फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उडणारे बलून्स, आकाश दिवे/ आकाशाकंदील, ड्रोन आदी आकाशांमध्ये सोडण्यास/ उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 23 ऑक्टोबर 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेश जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 31 Aug 2026 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit नियमावलीचे पालन करणे बंधनकारक सांगली | सांगली जिल्ह्यातील सर्व कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) अशा तत्सम आस्थापनांना जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी... Read more
- कृष्णा कालवा सुधारणा व बंदिस्तीकरणासाठी १२५ कोटींचा निधी मंजूर
- सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
- मोठी बातमी! शेतकरी कर्जमुक्तीचा दुसरा हप्ता जारी; ६,३६,०३६ शेतकऱ्यांना ५,०८६ कोटी रुपये वितरित
- राज्यातील 57 तहसीलदार, 25 नायब तहसीलदारांना पदोन्नती!
- इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; नियमित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत
- शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २ हजार ४२१ पदांसाठी मेगाभरती











































































