Last Updated on 07 Jun 2023 9:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्य सरकारकडून आणखी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
सांगली । सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे.जितेंद्र डुडी हे मूळचे जयपूर (राजस्थान) येथील असून ते 2016 मधील बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची आज तडकाफडकी बदली झाली असून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी याची नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली.त्यांच्या कार्यकाळात मॉडेल स्कूल नावाची संकल्पना राबवली जी पुढे राज्य शासनाने राज्यभर राबवली,त्याच प्रकारे स्मार्ट पीएसी ही संकल्पना राबवून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुधारली. पाणीपुरवठा योजना पारदर्शी करण्यावर देखील त्यांनी भर दिला होता.सुरुवातीला त्यांची झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती.केंद्र शासनाकडे सहाय्यक सचिव म्हणून काम केले आहे.
राज्य सरकारकडून आणखी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई | राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जवळपास 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यानंतर आता आज पुन्हा आणखी 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचे आदेश आज काढण्यात आले आहेत.
राज्य सरकारचे बदली आदेश असे
(अधिकाऱ्याचे नाव, सध्याचे ठिकाणी, बदलीनंतरचे पद)
1. श्री राजेश कुमार – IAS (1988) – ACS (RDD & PR), ग्रामीण विकास विभाग, यांची ACS (R&R) R&FD मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. श्री अनुप कुमार – IAS (1990) – ACS (सहकार आणि विपणन), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग यांना ACS (Agri.), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
5. श्रीमती राधिका रस्तोगी, IAS (1995) – यांना पीएस (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे.
6. श्री संजय खंदारे, IAS (1996) – यांना पीएस, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
7. श्री एकनाथ डवले, IAS (1997) – PS (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई यांची PS (RDD&PR), ग्रामीण विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. श्री सौरभ विजय, IAS (1998) – PS (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची PS आणि विकास आयुक्त, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. श्री आर.एस.जगताप, IAS (2008) यांची यशदा, पुणे येथील उपमहानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. श्री जितेंद्र दुडी, IAS (2016), CEO, ZP, सांगली यांची जिल्हाधिकारी, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.














































































