Last Updated on 29 Oct 2023 9:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तर प्रवीण जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड
सांगली । सांगली जिल्हा तलाठी,मंडळ अधिकारी संवर्ग पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अविनाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली.तर प्रवीण जाधव यांची उपाध्यक्षपदी यांची निवड झाली.
सांगली जिल्हा तलाठी,मंडळ अधिकारी संवर्ग पतसंस्थेच्या संचालक मंडळाची आज (रविवारी) मासिक सभा झाली.यात या निवडी करण्यात आल्या.निवड निर्णय अधिकारी म्हणून सचिव प्रवीण गोपुगडे यांनी काम पहिले.मावळते अध्यक्ष नंदकुमार पाटील व उपाध्यक्ष विश्वनाथ भांगे यांनी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार केला.(‘अधोरेखित’चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष विजय तोडकर,सरचिटणीस सुहास औताडे,राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौसमोहम्मद लांडगे, सांगली मंडळ अधिकारी विनायक यादव,तलाठी संदीप पाटील व सर्व संचाला उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष पाटील हे बहे (ता.वाळवा) येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत.तर नूतन उपाध्यक्ष प्रवीण जाधव हे मिरज तलाठी म्हणून कार्यरत आहेत.












































































