Last Updated on 13 Aug 2024 6:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । सांगली शहर व जिल्ह्यात हॉटेल रेस्टॉरंट ची विशेष तपासणी मोहिम अन्न व औषध प्रशासनाच्या सांगली कार्यालयामार्फत राबविण्यात आली. एकूण 23 हॉटेल, रेस्टॉरंटच्या सखोल तपासण्या करण्यात आल्या असून तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी/ दोषांच्या अनुषंगाने रेस्टॉरंट ना सुधारणा नोटीस देण्यात आल्या आहेत.
ग्राहकांना सुरक्षित व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या व्यापक जनहिताच्या व सार्वजनिक आरोग्य दृष्टिकोनातून पावसाळी दिवसांत दुषीत पाणी व अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू नये म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली पावसाळी मोहिमेंतर्गत सांगली शहर व जिल्ह्यात हॉटेल रेस्टॉरंट ची विशेष तपासणी मोहिम अन्न व औषध प्रशासनाच्या सांगली कार्यालयामार्फत राबविण्यात आली. एकूण 23 हॉटेल, रेस्टॉरंटच्या सखोल तपासण्या करण्यात आल्या असून तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी/ दोषांच्या अनुषंगाने रेस्टॉरंट ना सुधारणा नोटीस देण्यात आल्या आहेत.
तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीमध्ये सुधारणा न केल्यास फेर तपासणी अंती आस्थापणांनी त्रुटी/ दोषांची पूर्तता न केल्यास परवाना निलंबनाबाबतची कारवाई घेण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.










































































