Last Updated on 11 Oct 2022 12:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सर्वोच्च न्यायालयात पुन्हा महाराष्ट्राला बहुमान
दिल्ली | देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी मंगळवारी (11 ऑक्टोबर) पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. यानिमित्ताने लळीत यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा महाराष्ट्राला बहुमान मिळणार आहे. .
विद्यमान सरन्यायाधीश न्या. लळित यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर 2022 रोजी संपणार आहे.सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत उदय लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्र सरकारला पाठवले.विद्यमान सरन्यायाधीश लळित यांच्यानंतर धनंजय चंद्रचूड हे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत.त्यामुळे लळित यांनी चंद्रचूड यांची केंद्राकडे शिफारस केली आहे.
धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णु चंद्रचूड हे देशाचे 16 वे सरन्यायाधीश होते.त्यांचा कार्यकाळ हा 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 एवढा प्रदीर्घ म्हणजेच सात वर्षांचा राहिला होता.ते निवृत्त झाल्यानंतर 37 वर्षांनी त्यांचा मुलगा सरन्यायाधीश पदावर बसणार आहे.
धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. ते 10 नोव्हेंबर 2024 ला निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता त्यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.लळित यांच्यानंतर पुन्हा एकदा देशाला मराठमोळे सरन्यायाधीश लाभणार आहेत.












































































