Last Updated on 27 Sep 2022 9:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रायगड मधील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे थंडीच्या महिन्यात नंदनवनासारखे बहरून जाते. याठिकाणी अलीकडे अनेक साहसी खेळ देखील प्रसिद्ध झाले आहेत, किनाऱ्यावर पाणी उडवत घोड्यावरून रपेट मारायला जाणे असो किंवा पॅरासाईलिंग, बनाना बोट राइड, स्लीपर बोट राइड सारख्या थरारक खेळांचा आनंद घेणे असो हे सर्व रोमहर्षक क्षण इथे तुम्ही अनुभवू शकता. एकीकडे कोळीबांधवांचा उत्स्फूर्तपणे काम करत असण्याचा नजारा तर दुसरी कडे पांढऱ्या शुभ्र सीगलचे थवे नक्कीच आपले मन जिंकतील. या किनाऱ्यावर अनेक स्थलांतरित पक्षी देखील पाहायला मिळतात.














































































