Last Updated on 05 Nov 2022 7:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
लातूरात राज्यव्यापी युवा महोत्सव दिमाखात सुरू
![]()
लातूर । समाजामध्ये वावरताना आपला विवेक व विचार कायम जागे ठेऊन वावरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे असे परखड मत नामवंत लेखक आणि अभिनेते राजकुमार तांगडे यांनी व्यक्त केले.
लातूर येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती,राज्य युवा सहभाग आयोजित राज्यस्तरीय दोनदिवसीय युवा महोत्सवात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे होते.
उद्घाटन समारंभास विचार मंचावर अध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. कुलगुरू,मा.खासदार,विचारवंत जनार्दन वाघमारे,जिल्हाध्यक्ष अड.मनोहरराव गोमारे,राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे,राज्यसरचिटणीस रूक्साना मुल्ला,सुधाकर काशिद,सचिन थिटे,युवासहभाग विभाग राज्य कार्यवाह प्रियंका खेडेकर,जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर,जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले,रूपेश,हनुमंत मुंडे,शहराध्यक्ष बब्रुवान गोमसाळे,शहर कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे आदी होते.
ते पुढे म्हणाले की,धार्मिक,सांस्कृतिक,अर्थिक,राजकिय अंधश्रद्धा सोयीस्करपणे पसरवल्या जात आहेत.कलावंताने आधी माणूस बनायला हवे मगच कलाकार बनावे.शेतीमध्येही अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत.शिवरायांचे विचार व कार्य जाणून घ्यायचे असेल तर विवेकाच्या पथावर आल्याशिवाय गत्यंतर नाही.

जनार्दन वाघमारेच्या रूपाने लातूरमध्ये जनाधार लाभला.या महोत्सवाचे उद्घाटन करताना आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र पाहताना मान्यवरांसह सहभागी युवकांनी अपेक्षित बाबीचे फलक लावले यात हुंडामुक्त,अंधश्रद्धा निर्मूलन,संयमी, सक्षम,दर्जाची संधीची समानता,लिंग समभाव जोपासणारा,साहित्याने पुढारलेला,धर्म निरपेक्षता,चिकित्सक,जटामुक्त,व्यसनमुक्त,जातपात विरहित,पर्यावरण पूरक,कार्यकारणभाव शोधणारा,संविधान बांधिलकी,बलात्कारमुक्त, पुरोगामी व मानवतावाद असे कार्ड लावले.
मा.कुलगुरू जनार्दन वाघमारे मार्गदर्शन करताना म्हणाले की, धर्म हा डोळस असला पाहिजे.धर्मातील अनेक गोष्टीं बुध्दीच्या विपरीत आहेत.राज्य चालवताना धर्म नाही आला पाहिजे. घटनेची प्रास्ताविका हे भारताचे स्वप्न आहे.न्याय, स्वातंत्र्य,समता,बंधूता या चार खांबावर घटना उभी आहे.आपले स्वप्न आपले स्वप्न उद्याचा माणूस चांगला वर्तन करणारा,विवेकशील वागणारा,राहण्यासाठी कृती कार्यक्रम ठरवला पाहिजे.प्रश्न संपवण्याची वृती असली पाहिजे.
युवा सहभाग विभागाचे मेन्टार तथा संजय बनसोडे यांनी केला.अध्यक्षीय समारोप राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका खेडेकर यांनी,सूत्रसंचालन अमोल चौगुले यांनी केले.तर आभार रूषिकेष दरेकर यांनी मानले.यावेळी महोत्सवासाठी राज्यातील विविध विभागातून 150 युवकांनी प्रतिनिधित्व केले.
![]()











































































