Last Updated on 16 Sep 2023 9:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
छत्रपती संभाजीनगर । समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमातंर्गत करार पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य यावेळी उपस्थित होते.
राज्य स्तरावरील कार्यालयात 64 व जिल्हा स्तरावरील कार्यालयात 6187 असे एकूण 6251 कर्मचारी यांना याचा लाभ मिळेल. अतिरिक्त निधी राज्य शासनाच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.
या कर्मचाऱ्यांच्या मानधनापोटी 229 कोटी 56 लाख एवढा वार्षिक खर्च येतो.मानधनात 10 टक्के वाढ केल्यामुळे 252 कोटी 52 लाख इतका खर्च येईल.












































































