Last Updated on 28 Jul 2024 4:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी सोहळा झाला.विधान परिषदेच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदस्यांना शपथ दिली.यामध्ये पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे.
मागील काही दिवसांपूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या पार पडल्या. यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. विधान परिषदेमध्ये या सर्व आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह सदाभाऊ खोत यांनी शपथ घेतली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उपस्थित होते. भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडली. 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महायुतीने बाजी मारल्यानंतर शरद पवार गटाचे पुरस्कृत शेकपाचे जयंत पाटील पराभूत झाले. महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडणूक आले होते. कॉंग्रेस पक्षाची मतं फुटल्यामुळे महायुतीचे उमेदवार विजयी झाले.
1. पंकजा मुंडे-बीजेपी 2. योगेश टिळेकर-बीजेपी 3. अमित गोरखे-बीजेपी 4. परिणय फुके-बीजेपी 5. सदाभाऊ खोत-बीजेपी 6. भावना गवळी-शिंदे शिवसेना 7. कृपाल तुमाने-शिंदे शिवसेना 8. शिवाजीराव गर्जे-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी 9. राजेश विटेकर-राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, 10. प्रज्ञा सातव-कांग्रेस 11. मिलिंद नार्वेकर-उद्धव ठाकरे पार्टी या 11 सदस्यांनी शपथ घेतली.








विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.













































































