Last Updated on 24 Feb 2023 10:57 AM by Sanjay Patil/Adhorekhit
हुबालवाडीत राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन
सांगली । विद्यार्थ्यांना समाजातील प्रश्नांची जाणिव होणे गरजेचे असून ती जाणिव खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीरांच्या माध्यमातून होत आहे,असे प्रतिपादन उद्योजक बाबुराव हुबाले यांनी केले.
इस्लामपूर येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीराचे हुबालवाडी येथे उद्घाटन झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर हे अध्यक्षस्थानी होते.माजी सरपंच प्रकाश शिंदे,संजय हुबाले,प्रकाश कनप आदी उपस्थित होते.
ते म्हणाले,ग्रामीण समाज जीवनाशी या शिबीराच्या माध्यमातून जवळीक साधून समाजातील समस्या जाणून घेण्यासाठी अशा शिबीरांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगीतले. स्वयंसेविकांनी समर्पित भावनेतून या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे समाजातील प्रेरणास्थाने ओळखून त्यापासून आदर्श घेता आला पाहिजे. सामाजिक बांधिलकी ओळखून समाजातील समस्या अभ्यासून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न युवकांनी करायला पाहिजे असे सांगीतले.
प्राचार्य डॉ. अंकुश बेलवटकर म्हणाले,व्यक्तिमत्व विकासाबरोबरच ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा शिबीरांकडे चांगली संधी म्हणून पहायला हवे. तरूणांची ताकद मोठी आहे. या ताकदीचा आणि त्यांच्या विचारांचा समाजाला दिशा देण्यासाठी उपयोग व्हावा. यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी सेवाभावी वृत्ती रुजावी, श्रमाचे मूल्य उमजावे, तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती व समाजसेवेची जाणीव निर्माण होण्यासाठी अशा प्रकारच्या शिबीरांची आवश्यकता असल्याचे सांगीतले.
या सात दिवसीय शिबीरामध्ये ग्रामस्वच्छता,जलसंवर्धन,वृक्षसंवर्धन,माझी वसुंधरा,आजादी का अमृत महोत्सव प्रबोधन फेरी,प्लॅस्टिक निर्मुलन, ग्रामसर्व्हे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत,प्रबोधनात्मक व्याख्यानमालेअंतर्गत श्री. दिलीप क्षीरसागर, प्रा. उदयराज पाटील,बी.जी.पाटील,अॅड.सुहास माळी, प्रा.संजय चव्हाण,के.जी.निकम हे मार्गदर्शन करणार आहेत.प्रा. निलेश डामसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.डॉ. अशोक मरळे यांनी आभार मानले.प्रा. संजय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.सौ. मंगल कनप,धीरज हुबाले,सागर हुबाले,शमशाद मुलाणी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.










































































