Last Updated on 24 Apr 2022 3:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
सामाजिक कार्यामध्ये सदैव अग्रेसर असणारे शिरटे (ता. वाळवा) येथील उद्योजक अनिल बाळासाहेब पाटील यांनी आपला मुलगा मयंक उर्फ साईराज पाटील याच्या सहाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून चैत्र पौर्णिमेला गावातील सुमारे १३३ महिलांना अक्कलकोट दर्शन घडविले.श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मटामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुकावरती सर्व महिलांच्या वतीने अभिषेक करण्यात आला.

यावेळी त्या ठिकाणचे सर्व धार्मिक विधी श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमप्रिय शिष्य चोळाप्पा महाराज यांचे पाचवे वंशज वेदशास्त्रसंपन्न अनु महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्योतिष शास्त्र पंडित पवन गुरुजी यांच्या उपस्थितीत पार पडले.
अक्कलकोट दर्शन यात्रा गावातील मारुती चौक येथून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व गावातील ग्रामस्थांना व यात्रेकरूंना मार्गदर्शन करून प्रारंभ करण्यात आली.यावेळी उपस्थित असणारे सर्वांचे अनिल भाऊ पाटील गौरव समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष प्रशांत रणदिवे यांनी स्वागत केले.मार्केट कमिटीचे माजी सभापती दिलीप देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना उद्योजक अनिल पाटील यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आणि त्यांच्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व ग्रामस्थांनी मयंक उर्फ साईराज अनिल पाटील याला भरभरून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी विश्वास देसाई,माजी उपसरपंच सदानंद पाटील,जयवंत देसाई,दत्ताभाऊ सावंत,अमर देसाई,आदर्श पाटील,फत्तेसिंग रणदिवे,जयवंत पाटील,सुनील पाटील,पृथ्वीराज पाटील, अरुण देसाई यांच्यासह गावातील प्रमुख भजनी मंडळ आणि अनिलभाऊ पाटील गौरव समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.अनिल पाटील यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त यापूर्वी मराठी शाळेला झांजपथक भेट दिले होते.कोरोनाच्या काळात सर्व गावांमध्ये फिरून सर्वे करणाऱ्या आशा वर्करची काळजी घेऊन त्यांच्यासाठी मास्क;फेस शील्ड;टायझर; बॉटल; आणि इतर साहित्य दिले.गावांमध्ये महापूर आला असता सर्व पूरग्रस्तांची काळजी घेऊन आपला वाढदिवस साजरा न करता त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रदान केले होते.













































































