Last Updated on 24 Nov 2023 6:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । शासनाने काढलेल्या दूध दराबाबतच्या आदेशाची आज डोंबिवली येथे होळी येथे होळी करण्यात आली.यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य शासनाने दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रकाप्रमाणे सहकारी व खासगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत.रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार मुंबई मधील डोंबिवली या ठिकाणी आज दि. २४ जुलै रोजी काढलेल्या दूध दर परीपत्रकाची होळी करण्यात आली.
हेही वाचा – शासनाने दूध दरात वाढ करावी अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल – माजी मंत्री सदाभाऊ खोत
भविष्यात याबाबत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा भडका उडेल, असे देखील सांगण्यात आले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.








































































