Last Updated on 01 Jun 2023 10:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बहे येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ प्रदान कार्यक्रम
आशा स्वयंसेविका हसीना मुल्ला व अंगणवाडी सेविका सुनिता थोरात यांना पुरस्कार
![]()
सांगली । शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तबगार महिलांचा सन्मान केला. शासनाचा हा महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन माजी उपसरपंच सौ. विजयमाला संजय पाटील यांनी केले.
बहे ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात शासनातर्फे दिला जाणारा ग्रामपंचायतस्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ आशा स्वयंसेविका हसीना इकबाल मुल्ला व अंगणवाडी सेविका सुनिता श्रीकांत थोरात यांना प्रदान करण्यात आला.त्यावेळी सौ.पाटील बोलत होत्या.सरपंच संतोष दमामे,उपसरपंच हणमंत पाटील,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हणमंतराव पाटील,माजी उपसरपंच मनोज पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मान्यवरांकडून स्वीकारताना आशा स्वयंसेविका हसीना मुल्ला.
सौ.पाटील म्हणाल्या,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ‘चूल आणि मुल’ या समाज व्यवस्थेच्या चौकटीला झुगारून एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन आदर्श राज्य कारभार केला.स्त्री ही अबला नसून सबला आहे हे त्यांनी कर्तबगारीतून दाखवून दिले.त्यांच्याच नावाने आणि त्यांच्या जयंतीदिनी शासनाने राज्यातील प्रत्येक गावातील दोन कर्तबगार महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान केला.शासनाचा हा निर्णय महिलांच्या कर्तबगारीला न्याय देणारा असाच आहे.
यावेळी माजी उपसरपंच महादेव मोहिते,अधिक बडवे,सदाशिव सुतार,राजाराम थोरात,भगवान कोळेकर,प्रमोद सुतार,अधिक मोहिते,विष्णू थोरात,उस्मान शेख,गणेश शिंदे,शकुंतला थोरात,शारदा पवार,प्राथमिक आरोग्य उप केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.रुपाली शेडगे,धनश्री पाटील तसेच अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.ग्रामसेवक अमर वाटेगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.उपसरपंच हणमंत पाटील यांनी आभार मानले.ग्रामपंचायत लिपिक रामराव पवार,अधिराज मुळीक,योगेश डुकरे,गजानन कुंभार,नाथाजी निकम यांनी संयोजन केले.
![]()










































































