Last Updated on 05 Jul 2025 8:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शेतकऱ्यांनी तात्काळ ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक तयार करावा – तहसीलदार शामला खोत-पाटील
सांगली । केंद्र शासनाने कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत शेतकऱ्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सुरू केलेल्या ‘ॲग्रिस्टॅक (Agristack)’ योजनेच्या अंमलबजावणीला वेग मिळाला आहे. मात्र, शिराळा तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही या योजनेत सहभागी झालेले नाहीत.
महाराष्ट्र शासनाने १४ ऑक्टोबर २०१४ रोजी या योजनेला मान्यता दिली असून, दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे.
या क्रमांकाशिवाय पीएम किसान सन्मान निधी योजना, पीक विमा, दुष्काळी मदत, शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान यांसारख्या योजनांचा लाभ घेता येणार नाही, असे तहसीलदार शामला खोत-पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की,
राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनी तातडीने या योजनेत नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक मिळवावा.
नोंदणीसाठी काय करावे?
-
नजीकच्या CSC केंद्राशी संपर्क साधावा
-
किंवा स्वतः ऑनलाईन जाऊन नोंदणी करावी:
👉 https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh











































































