Last Updated on 20 Feb 2022 11:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
शहिद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी 8 आठ वाजता शिगाव येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण (वय २२) यांना वीरमरण आले.
शहीद रोमित चव्हाण यांचे पार्थिव दिनांक 20 फेब्रुवारी रोजी रात्री पुणे येथून इस्लामपूर येथे आणण्यात येणार असून सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता त्यांच्या मूळ गावी शिगाव येथील राहत्या घरी आणण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी 8 आठ वाजता स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
शहीद शिपाई रोमित तानाजी चव्हाण यांच्या अंत्यसंस्काराचा दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
सकाळी 6 वाजता पार्थिव शिगाव येथील राहत्या घरी येणार
त्या ठिकाणी सकाळी 6 ते 6.25 या वेळेत कुटुंबीय व नातेवाईकांच्या दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
सकाळी 6.25 वाजता शहीद कुटुंबाला गार्ड ऑफ ऑनर देऊन पार्थिव गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी नेण्यात येणार आहे.
सकाळी 6:40 वाजता गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी पार्थिव पोहोचणार. सकाळी 06.40 ते 7 वाजेपर्यंत सामान्य लोकांद्वारे अंतिम आदरांजली.
सकाळी 7 वाजता मिरवणूक स्मशानभूमीच्या दिशेने निघणार.
07.30 वाजता मिरवणूक स्मशानभूमीत पोहोचणार.
सकाळी 07.30 ते 07.50 वाजेपर्यंत मान्यवर आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून अंतिम आदरांजली.
सकाळी 07.50 ते – 08.00 वाजेपर्यंत संरक्षण अधिकारी आणि गार्ड ऑफ ऑनर यांच्याकडून अंतिम आदरांजली.
सकाळी 08.00 वाजता अंत्यसंस्कारासाठी पार्थिव जवळच्या नातेवाईकांकडे सुपूर्द.









































































