Last Updated on 27 Mar 2024 5:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । निवडणूक आयोगाने गुरुवारी केंद्र सरकारला ‘विकास भारत संपर्क’ अंतर्गत व्हॉट्सॲप मेसेज पाठवणे तातडीने थांबवण्याचे निर्देश दिले. वास्तविक, ‘विकसित भारत संपर्क’ अंतर्गत काल मोठ्या संख्येने लोकांना व्हॉट्सॲप संदेश पाठवले गेले. सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवले जात असणारे विकसित भारत संदर्भातले संदेश त्वरित थांबवले जावेत, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत. हे संदेश अजूनही नागरिकांच्या मोबाईवर पाठवले जात आहेत, अशा अनेक तक्रारी आयोगाकडे आल्या आहेत. त्यांची दखल घेऊन आयोगानं हे निर्देश दिले. मात्र, आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हे संदेश पाठवले होते. मात्र, नेटवर्क समस्येमुळे काही ठिकाणी ते उशिरा मिळत असावेत, असं स्पष्टीकरण मंत्रालयानं दिलं आहे.











































































