Last Updated on 06 Nov 2022 10:19 AM by Sanjay Patil/Adhorekhit
इस्लामपूर येथे दिशा होमिओपॅथिक क्लिनिकचा शुभारंभ
सांगली । सुमारे पावणेतीनशे वर्षांहून वर्षाहून अधिकचा इतिहास असणारी होमिओपॅथीकची उपचार पद्धती कित्येकांचे आयुष्य व्याधीमुक्त करण्यासाठी सार्थ ठरली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध होमिओपॅथीक तज्ज्ञ डॉ.बी.एस भोसले यांनी केले.
इस्लामपूर येथील मंत्री कॉलनी,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दिशा होमिओपॅथीक क्लिनिकच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.यावेळी श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा,पेठ गावच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती मीनाक्षीताई महाडिक,निवृत्त प्राचार्य श्री.विश्वास सायनाकर,महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.एन.आर पाटील,ज्येष्ठ नेते श्री.सी.बी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.बी.एस भोसले म्हणाले,सद्यस्थितीत बदलत असणाऱ्या लाइफस्टाईलमध्ये आजारांच्या निदानापासून ते रामबाण उपायांपर्यंत होमिओपॅथिक उपचारपद्धती प्रभावी ठरली आहे.

निवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले,या धावत्या काळात कोणत्याही व्याधींशिवाय जीवन सर्वांनाच जगता यावं यासाठी होमिओपॅथिक हा एक उत्तम पर्याय असून नव्याने सुरू होणारे हे क्लिनिक रुग्णांच्या आनंददायी आयुष्यासाठी दिशादर्शक ठरेल.
ॲड.एन.आर पाटील यांनी समाजाप्रती असणाऱ्या डॉक्टरांच्या योगदानाबद्दल ऋण व्यक्त करत दिशा होमिओपॅथिक क्लिनिक रुग्णांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरावे यासाठी शुभेच्छा व्यक्त केला.
सरपंच श्रीमती मीनाक्षीताई महाडिक यांनी होमिओपॅथिक उपचारपद्धती अत्यंत गुणकारी असल्याचे काही अनुभव व्यक्त करत असतानाच कोणत्याही दुष्परिणामाशिवाय इलाज हे याचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य असल्याचे मत विशद केले.
श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्रा.श्री.महेश जोशी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.इस्लामपूर नगरपरिषदेचे नगरसेवक डॉ.संग्राम पाटील पैलवान श्री.राजाराम माळी यांनी मनोगत व्यक्त केले.दिशा होमिओपॅथिक क्लिनिकच्या संचालिका डॉ.सौ.कोमल जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महर्षी शिंदे गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील,यशोराणा होमिओपॅथिक क्लिनिकचे डॉ.प्रवीण पाटील,वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक आर एम.बागडी,प्रा.डॉ.अशोक शिंदे,महेश मोरे,सुनील तवटे,डॉ.बी.एस.वर्मा,राहुल चिटणीस,वाळवा तालुका इंजिनिअरिंग असोसिएशन व माणुसकीचं नातं प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.ज्येष्ठ नेते बी एन.पाटील यांनी आभार मानले.
![]()












































































