Last Updated on 10 Aug 2023 2:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । “अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम अजून कित्येक वर्षे करावे लागणार आहे,समाजात संघटितपणे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कार्यकर्त्यांना अथक प्रयत्न केले पाहिजेत,या कामात समाजातील घटकांकडून सकारात्मक प्रतिसादाची गरज आहे,” असे मत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.शामराव पाटील यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता कुटुंब स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
शहीद डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या विशेषांकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना महा. अं. नि. स.राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले,” संघटनेचा ३४ वर्षाचा इतिहास अभिमानास्पद आहे.समाजातील अंधश्रध्दा,बुवाबाजी रोखण्याचे समितीने केलेले हे कार्य अत्यंत मोलाचे आहे.मानवतावादी,विवेकवादी मूल्य रुजजवण्याचे काम समिती करत आहे.”
राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रा.शामराव पाटील अण्णा,बॅडमिंटन मध्ये विविध स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलेले तेजल शिंदे यांचा गौरव करण्यात आला.प्रा.डॉ.संजय थोरात,
डॉ.राम घुले ,डॉ.काशिलिंग गावडे,दिलीप क्षीरसागर,प्रा.डॉ.नितीन शिंदे,प्रा सतीश चौगुले,प्रकाश कांबळे आदींची भाषणे झाली.प्रा.बी आर जाधव यांनी स्वागत केले.बजरंग सपकाळ यांनी आभार मानले.अजय भालकर यांनी सूत्रसंचालन केले.
प्राचार्य डॉ. सुदाम माने,निलेश कुडाळकर,संजय कुरणे,दीपिका शिंदे,वनिता बनसोडे,सीमा कुडाळकर,एम.डी.जाधव,बाबसाहेब हवालदार आदी उपस्थित होते.










































































