Last Updated on 14 Oct 2024 11:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आपल्या मतदारसंघात कोणीतरी हातात घड्याळ बांधून विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी करीत असल्याचे समजले. मात्र आपल्या मतदारसंघातील जनता हुशार आणि चाणाक्ष आहे. त्यामुळे त्यांचे चिन्हाच्या घोळाचे मनसुबे धुळीला मिळतील,असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी तुजारपूर व येडेनिपाणी येथील विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना दिला.
तुजारपूर व येडेनिपाणी येथे ९ कोटी ३३ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. आ.मानसिंगभाऊ नाईक, रणधीर नाईक,देवराज पाटील,बाळासाहेब पाटील,विजयराव पाटील,संजय पाटील, नेताजीराव पाटील,सुनिता देशमाने,रणजित पाटील,अतुल पाटील,संग्राम जाधव,देवराज देशमुख,तसेच डॉ.प्रकाश पाटील,आनंदराव पाटील,विकास कांबळे,येडेनिपाणी सरपंच श्यामबाला माळी,उपसरपंच प्रताप पाटील, तुजारपूर सरपंच तुकाराम सुतार,उपसरपंच संदीप पाटील,मंगल बाबर प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,आ.मानसिंगभाऊ नाईक यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून मतदारसंघाचा विकास साधला आहे. ते आपल्या पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना ताकद द्या. यावेळी येडेनिपाणी गावाने ‘माझी वसुंधरा’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवून आयुर्वेदीक दवाखान्यास मानांकन मिळविल्या बद्दल आ.पाटील यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा सत्कार केला.
आ.नाईक म्हणाले,आपल्या मतदारसंघा तील गावांना चांगल्या सुविधा देत गावा- गावात विकासात्मक बदल घडवून आणला आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांना मोठा निधी दिला आहे. भविष्यात उर्वरित विकास कामे मार्गी लावण्याबरोबर शेतातील रस्ते करण्यास प्राधान्य देणार आहे. डॉ.प्रकाश पाटील, शामबाला माळी,प्रताप पाटील,डॉ.सोमनाथ आबोलीकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
तुजारपूर येथे जि.प.शाळा खोल्या, हरिजन समाज मंदीर,तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तुजारपूर-येडेनिपाणी रस्ता सुधारणा,येडेनिपाणी अंतर्गत रस्ता काँक्रीटी करण या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
येडेनिपाणी येथे माजी सरपंच डॉ.सचिन पाटील,मकरंद पाटील,रायसिंग पाटील, राजाराम पाटील,सुभाष पाटील,सी.एच. पाटील,संजय पाटील,स्वप्निल रासकर,दिलीप पाटील,सचिन यादव,प्रताप पाटील,प्रमोद पाटील,प्रशांत पाटील,सुनिल खट्टे,लता पाटील,शंकर पाटील,तुजारपूर येथे भीमराव बाबर,अभिजीत पाटील,रोहन बाबर,संदीप बाबर,मकरंद पाटील,अर्जुन निकम,महेश पाटील,संतोष पाटील,रामचंद्र पाटील,अलका बाबर,तेजस्विनी बाबर,शोभा बाबर, शशिकला पाटील,प्रज्ञा पाटील,बाबासो शेळके,सौरभ कांबळे,सचिन लोंढे,अनिल निकम,संतोष पाटील,सुनील कांबळे यांच्या सह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.









































































