Last Updated on 03 Mar 2025 9:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई : विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं आज या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी पक्षाने विधान परिषदेचे सदस्य असलेल्या आमदारांना विधानसभेच्या मैदानात उतरवले होते. यामध्ये भाजपचे प्रवीण दटके (नागपूर मध्य), गोपीचंद पडळकर (जत) आणि रमेश कराड (लातूर ग्रामीण), शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी (अक्कलकुवा) आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर (पाथरी) यांचा समावेश होता. हे पाचही आमदार विधानसभेवर निवडूण गेल्यामुळे त्यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्चाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पाचही जागा रिक्त झाल्या होत्या. या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महायुतीमधील भाजपचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे १ आणि शिवसेना शिंदे गटाची एक जागा रिक्त आहे. या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीमुळे पाच नवीन कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी प्राप्त झाली असून त्यातील तीन भाजपाचे, प्रत्येकी एक आमदार शिंदे आणि अजित दादा गटाचे असतील.
या निवडणुकीसाठी सोमवार, १० मार्च २०२५ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. सोमवार, १७ मार्च, २०२५ पर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामांकन अर्जांची छाननी मंगळवार, १८ मार्च, २०२५ रोजी केली जाईल, तर नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवार, २० मार्च, २०२५ अशी आहे. गुरूवार, २७ मार्च, २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी ५ वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक २९ मार्च, २०२५ पर्यंत पूर्ण होईल.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 25 Oct 2026 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. ही लोकशाही केवळ संविधानावर आधारित नसून, ती निवडणुकांच्या प्रक्रियेद्व... Read more










































































