Last Updated on 19 Dec 2024 4:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नागपूर । विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ही घोषणा केली.निवडणुकीसाठी फक्त महायुतीकडून राम शिंदे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी कालचा शेवटचा दिवस होता, मात्र दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडून अर्ज आला नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केलं राम शिंदे यांचं अभिनंदन
राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं अभिनंदन केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असलेल्या राम शिंदे यांच्याकडून अहिल्यादेवींच्या बाण्याला साजेशी अशी कामगिरी होईल, असं विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अतिशय शिस्तीनं आणि संवेदनशीलपणे ते सभागृहाचं कामकाज चालवतील, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला,.
एक शिक्षक म्हणून सभागृहाला शिस्त लावण्याचं आणि त्यांच्याकडून आत्मसात करण्याच्या अनेक गोष्टी घडतील, असं फडणवीस म्हणाले. सामान्यातून असामान्यत्व घडतं, हे राम शिंदे यांच्या वाटचालीतून पाहायला मिळतं , असं सांगत, मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळावर प्रकाशझोत टाकला. वरिष्ठ सभागृह असलेल्या या सभागृहातल्या चर्चेचा दर्जा हा ऐतिहासिक दृष्ट्या कायम उंच राहिलेला आहे, तो दर्जा यापुढेही कायम राहील, असा प्रयत्न सगळ्यांकडून होण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राम शिंदे यांचं अभिनंदन केलं. न्याय, समता, बंधुता आणि लोकसेवेचा वसा अशा प्रकारची कामगिरी राम शिंदे यांच्याकडून होईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सभापती म्हणून एक नवा आयाम देतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. शिंदे यांचा स्वभाव, काम करण्याची पध्दत यामुळे विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. विरोधी पक्षांचं त्यांना संपूर्ण सहकार्य राहील, असं त्यांनी सांगितलं.
सभापती प्रा. राम शिंदे यांचा परिचय
आमदार प्रा. राम शंकर शिंदे, विधानपरिषद सदस्य, माजी मंत्री. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज.
वैयक्तिक परिचय
नाव – प्रा. राम शंकर शिंदे
जन्मतारीख – 1 जानेवारी 1967
शिक्षण – एम. एस्सी, बी.एड.
(वनस्पतिशास्त्र शरीरशास्त्र)
पत्ता – मु.पो. चौंडी, ता. जामखेड,
जि.अहिल्यानगर – 413205
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ
— प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य-2004 ते 2006
— तालुकाध्यक्ष, भाजपा जामखेड तालुका-2006 ते 2009
— जिल्हाध्यक्ष, भाजपा, अहिल्यानगर 2010 ते 2012
— सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र राज्य 2013 ते 2015
— प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र राज्य-2021
— सदस्य, भाजपा, कोअर कमिटी, महाराष्ट्र राज्य-2022
लोकप्रतिनिधी आणि कार्यकाळ-
— सन 2000-2005 – सरपंच, ग्रामपंचायत चौंडी
— सन 2009-2014 – आमदार
227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 12,500 मतांनी विजयी.
— 2014-2019 आमदार
-227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 38,000 मतांनी विजयी.
— सन 2014-2016 या दरम्यान गृह, कृषी, आरोग्य व पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले.
सन 2016-2019 या दरम्यान जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, वस्रोद्योग व पणन या विभागाचे कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले.
(सन 2016 ते 2019 या दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ” जलयुक्त शिवार अभियान ” हे जलसंधारण विभागांतर्गत प्रा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबवण्यात आले.)
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 28 Jul 2026 7:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit विदर्भ, कोकण अन् घाट माथ्यावर सतर्कतेचा इशारा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वाढणार मुंबई । बंगालच्... Read more












































































