Last Updated on 08 Mar 2022 9:06 AM by Sanjay Patil/Adhorekhit
जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावरून जलद प्रवास करता येणार
भारतीय रेल्वेने बांधला जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज
ढगांमध्ये बांधण्यात आलेला अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना.
जम्मू – काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बनत असलेल्या 359 मीटर उंचीच्या चिनाब पुलाचे दृश्य ……

359 मीटर उंच चिनाब कमानी प्रकारच्या बांधकामातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे.
प्रकल्पाची किंमत रु 27,949 कोटी
लांबी 1,315 मीटर
24,000 टन पोलाद वापरून बनलेल्या या पुलाचे आयुष्य 120 वर्षांपेक्षा जास्त असेल.
कटरा – बनिहाल क्षेत्रातला हा पूल फ्रांसच्या आयफेल टॉवर पेक्षा ही 35 मीटर उंच आहे.
चिनाब पूल जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे, जो अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधून पूर्ण करण्यात आला आहे
हा पूल 266 किमी प्रती तास वेगाच्या हवेचा सामना करण्यास सक्षम आहे.
जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल बांधला जात आहे. ‘चेनाब ब्रिज’ या नावाने प्रसिद्ध असलेला हा पूल डिसेंबर २०२२ पर्यंत रेल्वे वाहतुकीसाठी कार्यान्वित होऊ शकतो.
जम्मू काश्मीरमधील रैसी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी यांच्या दरम्यान चिनाब नदीवर हा रेल्वे पूल आहे. काश्मीर रेल्वे प्रकल्पातील उधमपूर ते बारामुल्ला मार्गावर हा पूल येतो. पीरपंजाल डोंगररांगांच्या पोटातून चिरत जाणारा हा टप्पा जम्मूला काश्मीर खोऱ्याशी जोडतो. २००२मध्ये या पुलाचे काम सुरू झाले. मात्र, या प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत अनेक शंका-कुशंका घेतल्या जाऊ लागल्यानंतर २००८मध्ये काम मध्येच थांबविण्यात आले. अत्यंत दुर्गम प्रदेश, भूकंपप्रवण क्षेत्र, अतिवेगवान वारे, आदी मुद्दे होते. अभ्यास झाल्यानंतर २०१० पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वेच्या इतिहासास हा पूल विज्ञान आणि तंत्रज्ञानांचं उत्तम उदाहरण म्हणून पुढे येणार आहे. प्रोजेक्टमध्ये एकूण 38 टनल आहेत. सर्वात लांब टनल ही 12.75 किलोमीटरची आहेत. ब्रिज बनवण्यासाठी एक खास प्रकारची केबल वापरण्यात आली आहे. ज्याची क्षमता 20 आणि 37 मेट्रीक टन आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 266 किलोमीटर प्रति तासाने जरी वारे वाहत असतील तरी हा पूल हलणार नाही.

तुलना यांच्याशी
चिनाब आर्च ब्रिज ३५९ मीटर
आयफेल टॉवर, पॅरिस ३२४ मीटर
बेपँजियांन रेल्वे पूल, गिझाऊं प्रांत (चीन) २७५ मीटर
कुतुबमिनार, दिल्ली ७२.५ मीटर










































































