Last Updated on 13 Oct 2025 1:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा पंचायत समिती सदस्यांसाठीची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. आरक्षण आपल्या सोयीचे जाहीर व्हावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. दरम्यान, आरक्षणाच्या घोषणेनंतर खऱ्या अर्थान प्रचाराला जोर येणार आहे.
प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन पाटील, निवासी नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे, निवडणूक नायब तहसीलदार दगडू उगले, अव्व्ल कारकून कैलास कोळेकर, मंडळ अधिकारी विनायक यादव, लिपिक सुनील साळुंखे आदींच्याउपस्थितीत इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू नाट्यगृहात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत काढण्यात आली.
गण निहाय आरक्षण असे :
कि.म. गड – ना. मा. प्र.महिला
रेठरेहरणाक्ष – ना. मा. प्र.महिला
ताकारी – अ. जा.महिला
बोरगाव – सर्वसाधारण
नेर्ले – सर्वसाधारण
कासेगाव – सर्वसाधारण महिला
वाटेगाव – सर्वसाधारण
रेठरेधरण – ना. मा. प्र.महिला
पेठ – सर्वसाधारण महिला
साखराळे – ना. मा. प्र.
वाळवा- सर्वसाधारण महिला
पडवळवाडी – सर्वसाधारण महिला
कामेरी – सर्वसाधारण
ऐतवडे बुद्रक – ना. मा. प्र.
चिकुर्डे – सर्वसाधारण
कुरळप- अ.जा.
गोटखिंडी- सर्वसाधारण महिला
बावची- सर्वसाधारण महिला
कारंदवाडी- सर्वसाधारण
बागणी- सर्वसाधारण
बहादूरवाडी- सर्वसाधारण महिला
येलूर- सर्वसाधारण

जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या सोडतीनुसार वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण असे :
१) वाळवा – ना. मा. प्र.
२) बोरगाव – ना. मा. प्र.महिला
३) कामेरी – सर्वसाधारण
४) पेठ – ना. मा. प्र.महिला
५) येलूर – सर्वसाधारण महिष्ण
६) कासेगाव – सर्वसाधारण महिला
७) वाटेगाव – सर्वसाधारण महिरण
८) चिकुर्डे – सर्वसाधारण
९) बागणी – सर्वसाधारण महिला
१०) बावची – सर्वसाधारण
११) रेठरे हरणाक्ष – सर्वसाधारण महिला












































































