Last Updated on 24 Feb 2024 11:42 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत वाळवा तालुक्यातील महसूल अभिलेख्यात तपासणी केलेल्या अभिलेखात १८ हजार ८३१ कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली,त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले होते.
तालुक्यातील महसूल अभिलेख्यात तपासणी केल्यानंतर अभिलेखात १८ हजार ८३१ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.मराठी व मोडी मध्ये नोंदी आढळून आलेल्या असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.
हेही वाचा – सांगली : जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाळवा तालुक्यातील संबंधित गावच्या चावडीमध्ये तसेच ग्रामपंचायत कार्यालयात त्या-त्या गावची नोंदी यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
महसूल अभिलेख्यात आतापर्यंत ६ लाख १२ हजार ५३७ अभिलेखे तपासणी करण्यात आले.त्यामध्ये १८ हजार ८३१ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.त्याचबरोबर पंचायत समितीत ५ लाख ४३ हजार १९३ अभिलेखे तपासणीत ६०७ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.
दरम्यान,कोणत्या गावात किती नोंदी आहेत याची माहिती अशी….
















































































