Last Updated on 09 Jun 2023 7:53 AM by Sanjay Patil/Adhorekhit
वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्याच्या वतीने 2417 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.बारावी विज्ञान शाखा किंवा भूगोल, अर्थशास्त्र किंवा गणित असा विषय घेऊन उत्तीर्ण झालेला उमेदवार यासाठी पात्र ठरणार आहे. इतक्या मोठ्या पदांसाठी जाहिरात आल्याने अनेकांना संधी मिळणार आहे.
यासाठी 10 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून 30 जूनपर्यंत अर्जाची शेवटची तारीख आहे.
फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळाववरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
अर्ज करण्याची मुदत
| ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात | ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत |
| दिनांक १10/6/2023 | दिनांक 30/6/2023 |
पद आणि पदसंख्या
| पद | पदसंख्या |
| लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-ब) (अराजपत्रित) | 13 |
| लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब) (अराजपत्रित) | 23 |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) (अराजपत्रित) | 8 |
| वरिष्ट सांख्यिकी सहाय्यक (गट क) | 5 |
| कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) | 15 |
| लेखापाल (गट-क) | 129 |
| सव्र्व्हेक्षक (गट-क) | 86 |
| वनरक्षक (गट-क) | 2138 |
अर्जाचा शेवटचा दिनांक : 30 जून 2023 (अर्ज सुरुवात 10 जून )
लेखापाल भरती सम्पूर्ण अधिकृत जाहिरात
सर्वेक्षक भर्ती सम्पूर्ण अधिकृत जाहिरात
वनरक्षक भरती सम्पूर्ण अधिकृत जाहिरात
लघु टंक लेखक सम्पूर्ण अधिकृत जाहिरात
| Circle (Section) | Vacancy (संख्या) |
| Nagpur (नागपूर) | 277 Posts |
| Chandrapur (चंद्रपूर) | 122 Posts |
| Gadchiroli (गडचिरोली) | 200 Posts |
| Amravati (अमरावती) | 250 Posts |
| Yavatmal (यवतमाळ) | 79 Posts |
| Aurangabad (औरंगाबाद) | 73 Posts |
| Nanded (नांदेड) | 10 Posts |
| Nandurbar (नंदुरबार) | 82 Posts |
| Dhule (धुळे) | 96 Posts |
| Jalgaon (जळगाव) | 68 Posts |
| Ahmednagar (अहमदनगर) | 11 Posts |
| Nashik (नाशिक) | 88 Posts |
| Pune (पुणे) | 73 Posts |
| Thane (ठाणे) | 310 Posts |
| Palghar (पालघर) | 150 Posts |
| Kolhapur (कोल्हापूर) | 249 Posts |
| (एकूण) | 2138 Posts (फक्त वनरक्षक) |
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भुगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी ) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
(टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)
अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
वयोमर्यादा
वायाची अट : 30 जून रोजी
- 21-40 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
- 18-40 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
- 18-27 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
- 18-40 वर्षे (SC/ST+5, OBC+3 yrs)
वेतन श्रेणी :
- गट क: रु. 29200-92300 व भत्ते
- गट क: रु. 25500-81100 व भत्ते
- गट क: रु. 21700 -69100 व भत्ते
- गट ब व क : रु. 25500-142400 व भत्ते











































































