Last Updated on 07 May 2024 9:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज रात्री 8 वाजेपर्यंत सुमारे 61.45 टक्के मतदान झाले आहे.या टप्प्यात दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या एकूण 93 जागांवर मतदान झाले.
देशाच्या अनेक भागांत कडक उष्मा असतानाही सर्वच घटकांतील मतदारांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि मतदान शांततेत पार पडले.आसाममध्ये रात्री 8 वाजेपर्यंत 75.26 टक्के मतदान झाले. त्याचवेळी बिहारमध्ये 56.66 टक्के, छत्तीसगडमध्ये 66.99 टक्के, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये 65.23 टक्के मतदान झाले. गोव्यात 74.27 टक्के, गुजरातमध्ये 56.76 टक्के, कर्नाटकात 67.80 टक्के, मध्य प्रदेशात 63.09 टक्के, महाराष्ट्रात 54.77 टक्के, उत्तर प्रदेशात 57.34 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 73.93 टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधून 25, कर्नाटकातील 14, महाराष्ट्रातील 11, उत्तर प्रदेशातील 10, मध्य प्रदेशातील नऊ, छत्तीसगडमधून सात, बिहारमधील पाच, आसाम आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी चार, गोवा, दादरा, नगर हवेली. तर दमणमध्ये प्रत्येकी दोन जागांवर मतदान झाले.
तिसऱ्या टप्प्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा, मनसुख मांडवीय, ज्योतिरादित्य सिंधिया, प्रल्हाद जोशी, शिवराज सिंह चौहान आणि बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.
साभार :
प्रसार भरती











































































